Yavatmal News : यवतमाळच्या नेर तालुक्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; चुकीच्या लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप

संदेश कान्हु, प्रतिनिधी  यवतमाळ : यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या हिर मचेश भोसले (वय 6 महिने) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी हिरची आई मजेशा मचेश भोसले आपल्या मुलीला अजंती जिल्हा परिषद शाळेत आयोजित नियमित लसीकरणासाठी घेऊन गेल्या होत्या. त्यानंतर रात्री चिमुकली झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी […]

Yavatmal News : यवतमाळच्या नेर तालुक्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; चुकीच्या लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप

संदेश कान्हु, प्रतिनिधी 

यवतमाळ : यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या हिर मचेश भोसले (वय 6 महिने) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी हिरची आई मजेशा मचेश भोसले आपल्या मुलीला अजंती जिल्हा परिषद शाळेत आयोजित नियमित लसीकरणासाठी घेऊन गेल्या होत्या. त्यानंतर रात्री चिमुकली झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर अधिकृत वैद्यकीय तपासणी झाल्यावर स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. पारधी बेड्यावर अनेक कुटुंबे तुटक्या-फुटक्या झोपड्यांमध्ये राहतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी वीजपुरवठ्याबाबत आदेश दिले होते. मात्र अनेक कुटुंबांपर्यंत अद्याप वीज पोहोचलेली नाही. पावसाळ्यात चिखल, अंधार, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि असुरक्षित जीवन यांचा सामना या समाजाला करावा लागत आहे.

हेही वाचा : Dadar Railway Station Viral Video: दादर स्टेशनवर भरदिवसा थरार! रेल्वे ट्रॅकवर महिलेला बेदम मारहाण; प्रवाशांसमोरच घडला धक्कादायक प्रकार

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number