पाकिस्तानातल्या हिंदूंची दिवाळी उत्साहात

  दिवाळी सण म्हटलं की, मौजमजा करण्याचा सण. प्रत्येक जण दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे प्रत्येक जण घरातच होते. त्यामुळे गेल्या वर्षीची दिवाळीसुद्धा नागरिकांना घरीच साजरी केली. मात्र यंदा कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे प्रत्येकजण दिवाळी सण उत्साहाने साजरा करत आहेत. यंदा भारतातील हिंदू बांधव […]

पाकिस्तानातल्या हिंदूंची दिवाळी उत्साहात

  दिवाळी सण म्हटलं की, मौजमजा करण्याचा सण. प्रत्येक जण दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे प्रत्येक जण घरातच होते. त्यामुळे गेल्या वर्षीची दिवाळीसुद्धा नागरिकांना घरीच साजरी केली. मात्र यंदा कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे प्रत्येकजण दिवाळी सण उत्साहाने साजरा करत आहेत. यंदा भारतातील हिंदू बांधव उत्साहाने, मौजमजा करत दिवाळी सण साजरा करत आहेत तसेच भारताचा कट्टर विरोधक पाकिस्तानातील हिंदू बांधवांनीही मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला आहे.

  दिवाळी सण भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. पाकिस्तानमध्ये यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजराक करण्यात आला. पाकिस्तानमध्ये सिंध, बलुचिस्तान, पंजाब या राज्यांमध्ये हिंदू समाज मोठ्या प्रमाणात राहतो. पाकिस्तानमध्ये हिंदू समजाची संख्या ८० लाखांच्या आसपास आहे. पाकिस्तानातल्या हिंदू बांधवांनी मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला आहे. पाकिस्तानमधील सिंध, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या हिंदू बांधवानी प्रकाशपर्वाचा हा तेजोत्सव धुमधडाक्यात साजरा केला आहे. या दिवाळी सणाच्या आनंदोत्सवात अनेक हिंदू बांधव सहभाही झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number