हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन…

हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा कोसळलीय. गणपतराव यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लाल मातीतील हिरा हरपल्याची भावना कुस्तीगिरांकडून व्यक्त होतं आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती […]

हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन…

हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा कोसळलीय.

गणपतराव यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लाल मातीतील हिरा हरपल्याची भावना कुस्तीगिरांकडून व्यक्त होतं आहे.

कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात. गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही.

आंदळकर यांची कामगिरी – 

आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली.

त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली.

पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या.

१९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले.

१९६४ मध्ये टोकिओ ऑलि​पिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती.

महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे.

१९६७पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले.

त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जो​शीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद​ विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही मल्लांची नामावलीवरून त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number