बिपरजॉयमुळे समुद्रात उंच लाटा

चक्रीवादळ बिपरजॉय तीव्र झाले असून अधिक रौद्र रुप धारण करत असल्याचे वृत्त आहे. ज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात समुद्र किनारपट्टीवर संकेत मिळत आहे. चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर 12 जूनला उंचच उंच लाटा पाहायला मिळत आहेत. तर वादळामुळे पाकिस्तानमध्ये भूस्कलन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या […]

बिपरजॉयमुळे समुद्रात उंच लाटा

चक्रीवादळ बिपरजॉय तीव्र झाले असून अधिक रौद्र रुप धारण करत असल्याचे वृत्त आहे. ज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात समुद्र किनारपट्टीवर संकेत मिळत आहे. चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर 12 जूनला उंचच उंच लाटा पाहायला मिळत आहेत. तर वादळामुळे पाकिस्तानमध्ये भूस्कलन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात रविवारी रात्री पाऊस झाला. मुंबई शहर तसेच राज्याच्या किनारपट्टीच्या भागातही जोरदार वारे वाहू लागले कारण बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने राज्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याचेही ते पुढे म्हणाले. वेगवान वारे आणि धुलीकण यांमुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. तसेच, दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे शहरात समुद्री लाटांमुळे पर्यटक काहीसे घाबरुन गेले. समुद्राच्या तीव्र लाटा किनाऱ्यावर आदळल्याने पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली. काहींनी सुरक्षेसाठी सुरक्षीत ठिकाणी धाव घेतली. या वेळी पर्यटकांची काहीशी धावपळ उडाली. दरम्यान, या प्रकारात कोणासही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ बिपरजॉय, गेल्या सहा तासांत 8 किमी प्रतितास वेगाने उत्तर-पूर्वेकडे सरकत आहे. आज त्याची उत्तर-ईशान्य दिशेने वाटचाल सुरु राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सकाळी चक्रीवादळाची तीव्रता “अत्यंत तीव्र चक्री वादळ” मध्ये बदलली.

भारतीय हवामान विभाग ने अंदाज वर्तवला आहे की चक्रीवादळ 15 जून रोजी दुपारच्या सुमारास गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेश तसेच पाकिस्तानच्या लगतच्या किनारपट्टीला ओलांडण्याचा अंदाज आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number