जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि तिला मध्यरात्री मसाज करायला लावले. या आरोपांच्या संदर्भात त्या मुलीच्या जबाब नोंदवण्यात आला. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ठाणे पोलिसांना दिले.
आयुक्त जयस्वाल हे रात्री उशिरा आपल्याकडून मसाज करून घ्यायचे, असे सांगत पीडित मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याविषयी स्पष्टीकरण देताना, तो व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर मुलीचे कुटुंब लगेचच घर सोडून गेल्याने मुलीचा जबाब नोंदवता आला नसल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मुलीच्या आरोपांविषयी साशंकता असल्याचेही सरकारी वकिलांनी नमूद केले. मात्र, ‘मुलीच्या आरोपांविषयी शंका असली तरी पोलिसांनी कायद्यातील तरतुदींप्रमाणेच तिचा जबाब नोंदवायला हवा होता’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.