High Court on Mumbai Local Train: ‘लोकलच्या दारात उभं राहणं म्हणजे निष्काळजीपणा नाही…’, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

या पार्श्वभूमीवर लोकलच्या दारात उभं राहणाऱ्या बाबात उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे.

High Court on Mumbai Local Train: ‘लोकलच्या दारात उभं राहणं म्हणजे निष्काळजीपणा नाही…’, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असलेली दिसून येत आहे. असे असतानाच कल्याण-डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमधून  पडल्याने प्राण गमवावे लागलेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना 8 लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असे महत्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

गेल्या काही वर्षांत लोकलमध्ये प्रचंड गर्दी वाढली असून नागरिकांना अक्षरशा लोकलच्या दारात उभं राहून किंवा लटकून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हा लोकलचा प्रवास बऱ्याचदा धोकादायक आणि जीवघेणा ठरतो. लोकलच्या दारातून पडल्यानंतर घटनांनंतर प्रवाशांनाच जबाबदार धरले जाते. मात्र,या पार्श्वभूमीवर लोकलच्या दारात उभं राहणाऱ्या बाबात उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जर लोकलच्या दारात उभं राहणं हे निष्काळजीपणाचे लक्षण मानता येणार नाही हा निर्णय दिलेला आहे. 

हेही वाचा – Wondering Country: स्वतःचे विमानतळच काय तर चलनही नाही; तरीही 'हा' छोटासा देश आहे श्रीमंत, काय आहे यामागील गुपित? 

ज्यात न्यायालयाने रेल्वेला अपघाताच्या तारखेपासून 6 टक्के वार्षिक व्याजासह 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मिळाले आहेत.बाळकृष्ण भंडारी नावाच्या सेल्समनचा 29 जानेवारी 2012 ला ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला होता. 

हेही वाचा – India Pharma Export: भारताची औषध निर्यात सुस्साट! 28 अब्ज डॉलरचा आकडा पार, 2030 पर्यंत 130 अब्ज डॉलरचे लक्ष्य 

यानंतर भंडारी यांच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र 2019 मध्ये भंडारी यांच्या कुटुंबीयांचा दाव रेल्वे प्राधिकरणाने फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number