जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दहीहंडी खेळावरील सर्व निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने हटवले आहेत. दहीहंडीच्या सणावर घालण्यात आलेले वय आणि उंचीचे विधीमंडळानं ठरवावेत असा निर्णय मुंबई
उच्च न्यायालयाने दिला आहे.
त्यामुळे आता सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 14 वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही.
त्यामुळे यंदा दहीहंडीची उंची कितीही असली तर सर्वात वरच्या थरावर बालगोविंदा दिसणार नाही.
दहीहंडीच्या थरांची उंची, गोविंदाची सुरक्षितता, त्यांची वयोमर्यादा या सर्व विषयांना हात घालणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
त्यावर सुनावणी करताना गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने अनेक निर्बंध लावले होते. मात्र पूर्वीचे निर्बंध बाजूला ठेवून सुनावणी केली जाईल हे उच्च न्यायालयानं आधीच
स्पष्ट केले.