राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानवाढीमुळे उष्णतेची लाट आली असून उकाडा वाढला आहे. उष्माघातात ५ महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिह्यासह विदर्भात 42 अंश सेल्सिअसच्या पुढे पारा गेला आहे. दरम्यान, बुधवार, १७ मेपासून मुंबईसह कोकणात तापमानवाढीमुळे उकाडा वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिह्यामध्ये पारा ४२ ते ४४ अश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील जळगाव, नांदेडसारख्या जिह्यांमध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत निव गमावला. राज्यात तापमानवाढीबरोबर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोंदियात आज सर्वाधिक ४२.८ तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.