‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. हेरा फेरी ३ या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडचण निर्माण झाली आहे. हा वाद चित्रपट निर्मितीच्या आधिकाराशी निगडित आहे. इरॉस इंटरनॅशनलने सिनेमाच्या विरोधात एक कायदेशीर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे सध्या चर्चा रंगल्या आहेत.
इरॉस इंटरनॅशनलने ‘हेरा फेरी ३’ सिनेमाच्या निर्मात्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे.या नोटीसमध्ये सिनेमाचे सर्व राइट्स हे अजूनही इरॉस इंटरनॅशनलजवळ असल्याचा दावा केला आहे. तसेच नाडियादवाला ग्रुपने अद्याप त्यांना 60 करोड रुपये देणं बाकी आहे असे देखील त्यात नमूद केले आहे.
कम्प्लिट सिनेमा मॅगझीनमध्ये प्रदर्शित झालेल्या नोटीसमध्ये ”इरॉस जवळ सिनेमाचे राइट्स आहेत . ज्यामध्ये टायटलच नाही तर सिनेमाचे डिजिटल,म्युझिक राइट्स देखील त्यांच्याजवळ आहेत. तसेच नाडियादवाला कोणत्याही तिसऱ्या पक्षाला इरॉसच्या सहमतीशिवाय सिनेमाचे राइट्स विकू शकत नाहीत यावर देखील दोन्ही ग्रुपचं एकमत झालं होतं” असे नमूद केले आहे.