जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एटीएस प्रमुख असलेले हेंमत करकरे यांचे बुलेटप्रूफ जॅकेट जेजे रुग्णालयातील सफाई कामगारांनी कचऱ्यात टाकले असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते
गलगली यांनी समोर आणली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचे बुलेटप्रूफ जॅकेटची माहिती मागितली होती. मुंबई हल्ल्यादरम्यान करकरे
यांना जेजे रुग्णालय येथे उपाचारादरम्यान दाखल करण्यात आले होते.
मात्र, सफाई कामगारानं त्यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेट आणि कपडे अंगावरुन काढून ते कच-यांमध्ये टाकले अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी सुरेश
सपकाळ यांनी गलगली यांना दिली.