काजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणचं स्पेशल सरप्राइज…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली बॉलीवुडची अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. कजोलच्या वाढदिवसानिमित्त काजोलचा येणारा चित्रपट हॅलीकॉप्टर ईला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाला अजय देवगण आणि धवन जयंतिलाल गढा यांनी प्रोड्यूस केले आहे. या चित्रपटाचे दिगदर्शक प्रदीप सरकार असून हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात काजोल एका गायिकेची भूमिका साकारत […]

काजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणचं स्पेशल सरप्राइज…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलीवुडची अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. कजोलच्या वाढदिवसानिमित्त काजोलचा येणारा चित्रपट हॅलीकॉप्टर ईला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

या चित्रपटाला अजय देवगण आणि धवन जयंतिलाल गढा यांनी प्रोड्यूस केले आहे. या चित्रपटाचे दिगदर्शक प्रदीप सरकार असून हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

या चित्रपटात काजोल एका गायिकेची भूमिका साकारत आहे. ती आपल्या मुलासाठी आपल्या स्वप्नांना मागे टाकते. मात्र तिच्या प्रेमाला न समजून घेता तिचा मुलगा घर सोडून जातो.

त्यानंतर ती आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगते तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते हा संपूर्ण प्रवास काजोलने आपल्या भूमिकेतून अगदी योग्य रितीने साकारला आहे.

आनंद गांधीच्या गुजराती प्ले ‘बेटा कगाडो’वर बनलेला हा चित्रपट एक सिंगल मदर ‘इला’च्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काजोल आपलं पूर्ण आयुष्य आपल्या मुलासोबत जगताना दिसत आहे.

पण जेव्हा तो मोठा होता तेव्हा त्याला एका टप्प्यावर आईच्या प्रेमाचा त्रास होऊ लागतो.

या चित्रपटात काजोलच्या मुलाची भूमिका रिध्दी सेन साकरणार आहे. तसेच या चित्रपटात नेहा धूपियाही महत्वाची भूमिका साकारणार आहे.

काजोलने या चित्रपटात साकारलेली उत्तम भूमिका ही तीच्या चाहत्यांसाठी नक्कीचं एक मस्त बर्थडे सरप्राइज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number