जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दक्षिण मुंबईत जड वाहनांना आणि खासगी बसना 17 तास चालवण्यावर वाहतुक पोलिसांनी बंदी घातली आहे.
शहरातील इतर भागात ही जड वाहनं आणि खासगी बसं 9 तास चालवण्यावरही बंदी असल्याचं समोर येत आहे.
2 महिन्यांसाठी ले प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत सुरू असलेलं मेट्रोचं काम आणि रस्त्यांवर वाहनांची वाढती संख्या यामुळे हे प्रतिबंध घालण्यात आल्याचं कळते.
दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना फक्त 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्देशित केलेल्या स्थानकांवर पोहोचण्याची अनुमती आहे.
जड वाहतुक पहाटे 1 वाजल्यापासून 6.59 पर्यंत करता येणार आहे.
कुठं वाहने थांबवू शकता?
पी.डी. मेलो रोडवरील मॅलेट बंदर जंक्शन
बी ए रोड वरील के शांताराम पुजारी चौक
एनी बेझंट रोडवरील सेंट्रील मील
एल्फीस्टन जंक्शन, सेनापती बापट मार्ग
बॅरिस्टर नाथ पै रोड
रे रोड