मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पावसाने बुधवार नंतर मुंबईत थोडी विश्रांती घेतली होती. 3 दिवस थोडा फार पाऊस पडत होता पण त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या कामावर काही फरक पडला नव्हता. मुंबईत आज सकाळ पासूनचं ढगाळ वातावरण होत मात्र 11 वाजेनंतर जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि अर्ध्या तासात मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. ठाणे आणि कल्याण परिसरातही […]

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पावसाने बुधवार नंतर मुंबईत थोडी विश्रांती घेतली होती. 3 दिवस थोडा फार पाऊस पडत होता पण त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या कामावर काही फरक पडला नव्हता.

मुंबईत आज सकाळ पासूनचं ढगाळ वातावरण होत मात्र 11 वाजेनंतर जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि अर्ध्या तासात मुंबईतील सखल भागात पाणी साचलं.

ठाणे आणि कल्याण परिसरातही पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कल्याण – कर्जत रेल्वेस्थानकावर पाणी साचल्याने कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली.

या मुसळधार पावसामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले आहेत. तसेच मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number