Mumbai Local Update: मुंबईत मुसळधार पाऊसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर; ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम आणि सेंट्रलचं काय?

रात्रभर संततधारेने एकीकडे अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मध्यरात्री पासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला आहे. 

Mumbai Local Update: मुंबईत मुसळधार पाऊसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर; ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम आणि सेंट्रलचं काय?

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना पावसाने दिलासा दिला आहे. दरम्यान रात्रभर संततधारेने कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. एकीकडे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच सबवे पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मध्यरात्री पासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला आहे. 

पहिल्याच पावसात पश्चिम, मध्य आणि हर्बर या तिन्ही मार्गांवर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. यावेळी पश्चिम मार्गावर दादर स्थानकात रुळावर पाणी साचल असून फलाट क्रमांक 5 वरून सुटणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.पश्चिम रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिरा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायन-कुर्ला आणि दादरच्या आसपास रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर हार्बर मार्गावरील वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचा परिणाम स्थानिक सेवांवर झाला आहे. 

हेही वाचा- Mumbai Rain : महिनाभरानंतर वरुणराजा बरसला! मुंबईत अनेक भागात पाणीच पाणी; महापालिकेकडून विशेष ट्विट

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत असल्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल होत आहेत, तसेच स्थानकांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.पहिल्याच पावसात मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून जवळपास 15 ते 20 मिनिटे मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. तुर्भे आणि कोपर खैरने येथे ट्रकवर पाणी साचल्याने ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या स्थानकाच्या रेल्वे ट्रकवर आतापर्यंत पाणी येण्याचा पहिलाच अनुभव असून रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती समोर आली आहे.

तर नवी मुंबईत ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल ट्रान्स हार्भर लोकलवर माती खचल्याने लोकल विस्कळीत झाली आहे. यावेळी पनवेलहून नवी मुंबईला येताना अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. तुर्भे ते कोपरखेरने दरम्यान पावसामुळे रेल्वे रुळखालील माती खचल्याने वाहतूक सकाळी 6 वाजल्यापासून विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान रेल्वे पोलीस बंदोबस्तात माती टाकण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मुंबईत रात्री पाऊन मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पाऊस मोठा असल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. तर लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number