Weather Update : राज्यात मुसळधार पावसाची बॅटिंग! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; नागरिकांना महत्वाच्या सूचना

राज्यात मुंबईसह पुणे कोकण या भागात चांगला पाऊस झाला आहे. उद्यापर्यंत पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Weather Update : राज्यात मुसळधार पावसाची बॅटिंग! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; नागरिकांना महत्वाच्या सूचना

राज्यात मुंबईसह पुणे कोकण या भागात चांगला पाऊस झाला आहे. उद्यापर्यंत पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ​दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पावसाच्या या सरींमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण राज्यात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान आज देखील हवामान खात्याने दिला मुंबई आणि आसपासच्या परिसराला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावेळी नवी मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, पनवेल, भिवंडी आणि पालघर परिसरात रात्रभर पावसाची बरसात सुरु झाली आहे. पश्चिमेकडून वाहणारे वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता अधिक झाल्यामुळे मुंबई, पुणेसह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे.

हेही वाचा- Assam Flood : आसाममध्ये महापूर! गेल्या 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, 3.6 लाख लोक बेघर

विदर्भासह मराठवाड्यात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा  
तसेच विदर्भासह मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा चांगलाच जोर आहे. नाशिक शहर आणि परिसरात देखील पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सूर झाला आहे. यावेळी जिल्यातील नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्याला हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केला असून, काल रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल 15 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर झालेल्या या पावसामुळे शेतातील सुकत असलेल्या पिकांना मोठा जीवदान मिळालं आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number