बुधवारी राज्यात मुंबईसह जोरदार पाऊस

बुधवारपासून मुंबईसह राज्यात जणू काही जुलै महिना परतला आहे की काय असेच वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसत आहे. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला संध्याकाळपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. नवी मुंबईतील खारघर, […]

बुधवारी राज्यात मुंबईसह जोरदार पाऊस

बुधवारपासून मुंबईसह राज्यात जणू काही जुलै महिना परतला आहे की काय असेच वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसत आहे. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला संध्याकाळपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, कळंबोली आणि पनवेल भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरींनी अधूनमधून हजेरी लावली. बुधवारी संध्याकाळपासून अवकाळीने मुंबईसह एमएमआरडीए भागात जोरदार पाऊस झाला.

हवामान विभागाने मुंबईत यलो अलर्ट दिल्याने आजही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे थंडीच्या दिवसातही पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता डिसेंबर महिन्यातला ७६ मिमी पावसाचा विक्रम तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number