पावसाने काही दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यात थैमान घातला आहे. गोंदिया जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. तर गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने नदीनाले तलाव पाणी भरल्याचे चित्र आहे.
राजापूर
कोकणात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारंवार अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटामुळे दरड कोसळून रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूर आणि पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
नाशिक
नाशिक महामार्गावरील कसारा घाटासह पडघा ते गोंदेतरम्यान महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यातच आता नाशिककडे जाणा-या जुन्या कसारा घाटातीस रस्त्याला तडे गेल्याने खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भंडारा
भंडारा जिल्ह्यात पाऊस ओसरला असला तरीही नदी- नाले दुथडी भरून वाहत आहे. त्यातच लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून या गावाचा तालुक्याशी अद्यापही संपर्क तुटलेलाच आहे. प्रशासनाच्या मदतीने ‘दोन रुग्णांना नदीपार केले. लाखांदूर तालुक्यातील आवळी गावातील प्रकार आहे.
सिंधुदुर्ग
कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने शनिवारी सायंकाळीपासून रात्री एक वाजेपर्यंत ब्रिटीश कालीन आंबेरी पूल पाण्याखाली होता. सात तास ब्रिटीश कालीन आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने २७ गावांचा संपर्क तुटला होता.
पिंपरी
निफाड तालुक्यातील पिंपरी-रौळस या रस्त्यावरील कादवा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून देखील एक दुचाकीस्वार अक्षरशः पुराच्या पाण्यात रस्ता पार करत असतानाचे चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत
नवी मुंबई
मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पातळी चांगलीच वाढली आहे. धरणात आतापर्यंत ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी २३०० मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे.
मालेगाव
रविवारी सकाळी ७.०० वाजता गिरणा धरणाचे वक्रद्वार क्रमांक २ व ५ प्रत्येकी एक फुटाने उघडण्यात आलेले आहे. सध्यस्थितीत धरणाचे ४ वक्रद्वारे १ फुटाने उघडी असून त्याद्वारे नदीपात्रात एकूण ४७५२ क्युसेक पाण्याच्या विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे