जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून मुंबईत दाखल झाला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबई आणि पुण्यात आज मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली.
येत्या 48 ते 72 तासांत मुंबई शहर, उपनगर आणि सागरी किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा इसारा हवामान खात्यानं दिला आहे.
मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, उपनगरात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तर, उकाड्याने हैराण झालेले पुणेकर मात्र पावसामुळे सुखावले आहेत.