Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, जोरदार वारे अन् मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढली असून विदर्भातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, जोरदार वारे अन् मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एन्ट्री झाली असून हवामान विभागाने रविवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भात मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Weather Update: 31 मेपासून संपूर्ण कोकणात पाऊस सक्रीय; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काय स्थिती?

मराठवाड्यातही पावसाची सक्रियता वाढणार असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रातही हवामान बदलाचे संकेत मिळत आहेत. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुणे, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा: Low Rainfall Impact on Economy : दुष्काळात तेरावा महिना! आखाती युद्धाचा फटका अन् कमी पावसाच्या अंदाजानेही दिली चिंता; महागाईचा दुहेरी हल्ला!

कोकणात मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, पालघर, सिंधुदुर्ग, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number