या जिल्ह्यांना पुढच्या ३-४ तासांत मुसळधार पाऊस

पुढील ३-४ तासांमध्ये राज्याच्या ७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ ते ४ तासांसाठी राज्याला मुसळधार पावसाचा इशारा […]

या जिल्ह्यांना पुढच्या ३-४ तासांत मुसळधार पाऊस

पुढील ३-४ तासांमध्ये राज्याच्या ७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ ते ४ तासांसाठी राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पुढचे काही दिवस राज्यात असेच हवामान असेल, अशीही माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ तारखेला म्हणजेच गुरुवारपासून हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वारा वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी पुढील ३-४ तासांत धुवांधार पाऊस होईल. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या,

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number