सिंधुदुर्गात संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा आहे. मात्र, सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

सिंधुदुर्गात संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

२१ जुलै, २०२४ सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा आहे. मात्र, सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे, सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे. कोकणात पुढील तीन तासात मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क रहावे असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तिलारी धरण हे ८० टक्के पेक्षा जास्त भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number