सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे.
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.