मुंबईत बुधवारी अतिवृष्टी

मुंबई, ५ जुलै २०२३, प्रतिनिधी: गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेली चक्रीय वातस्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे आज मुंबईत आणि ठाण्यात […]

मुंबईत बुधवारी अतिवृष्टी

मुंबई, ५ जुलै २०२३, प्रतिनिधी: गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेली चक्रीय वातस्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे आज मुंबईत आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट दिला असून चाकरमान्यांनी घरूनच काम करण्याचा सल्ला दिला जात आहे.

मुंबई, ठाण्यामध्ये काही ठिकाणी आज, बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्याची प्रणाली सिंधुदुर्गाजवळ असून, ती अधिक सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढू शकतो. सह्याद्रीला धडकून कोकणामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरीमध्येही तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई, कोकण तसेच विदर्भात पावसाची तूफान बॅटिंग सुरू असतांना पुढील काही दिवस राज्यातील काही भागात मुसळधार तर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील काही दिवस कोकण, मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मॉन्सूनने संपूर्ण भारत व्यापल्याने हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. दरवर्षी ८ जुलैपर्यंत मॉन्सून हा संपूर्ण भारत व्यापत असतो. मात्र, यावर्षी, ८ जुलैच्या आधी मॉन्सूनने राज्य व्यापले आहे. दरम्यान, राज्यात तसेच देशात अनेक भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number