जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचलं. या जोरदार पावसामुळे मुंबीतील रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचल्यानं मुंबईतील लोकल 10 ते 15 मिनिटं उशीराने धावत आहेत.
या जोरदार पावसाने मुंबईकरांना चागंलचं झोडपलं आहे. मुंबईतल्या सांताक्रूझ मध्ये देशातला सर्वात जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
#MumbaiRains have crossed the 200 mm mark in 24 hours. In the last 24 hours from 8.30 am on Sunday, Santa Cruz recorded 231 mm of #rains. Expect showers to be as intense today as well. #MumbaiRain #MumbaiMonsoon #MumbaiRainsLive #Mumbai @RidlrMUM @MumbaiMirror @TOIMumbai — SkymetWeather (@SkymetWeather) June 25, 2018