मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईत आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच मुंबईतील काही सखोल भागात पाणी साचले आहे. या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि कल्याण परिसरात सुरू असलेली कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि विठ्ठलवाडी परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच कर्जत […]

मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच मुंबईतील काही सखोल भागात पाणी साचले आहे. या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि कल्याण परिसरात सुरू असलेली कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

कर्जत आणि विठ्ठलवाडी परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच कर्जत रेल्वेस्थानकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

 ठाणे आणि कल्याण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

कर्जत आणि विठ्ठलवाडी परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

तसचं संततधार पावसामुळे कल्याणमधील ढोके गावाचा संपर्कही तुटला असून कल्याणमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याँना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number