गेल्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण आणि गोवा येथे मान्सून सक्रिय आहे. भारतीय हवामान खात्याकडून रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत हा पाऊस असाच राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगडमध्ये गुरूवारी हाय अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळू शकतात. असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र येथे मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडू शकतो.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. ठाण्यासह कोकणातील शाळा या पार्श्वभूमीवर कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील घडामोडींतून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तास पाऊस पडणार असा अंदाज आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. असा ही अंदाज आहे. गुरुवारी मुंबई, रायगड जिल्ह्य़ात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असं सांगण्यात आलं आहे.