येत्या 48 तासात पुणे, विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

येत्या 48 तासात विदर्भ, पुणे यासह पश्चिम महाराष्ट्रात आता तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट मुसळधार पावसाचा।इशारा नागपूर हवामान विभागानं दिलाय. बंगालच्या उपसागरात […]

येत्या 48 तासात पुणे, विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

येत्या 48 तासात विदर्भ, पुणे यासह पश्चिम महाराष्ट्रात आता तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट

मुसळधार पावसाचा।इशारा नागपूर हवामान विभागानं दिलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पावसाळ्यातील सर्वात स्ट्रॉंग हा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळं पुढील दोन दिवस विदर्भातील काही भागात मुसळाधार पाऊस राहणार आहे.

विदर्भाच्या अनेक भागात गेल्या 12 दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जुन- जुलै महिन्यात पावसाची तुट भरुन निघाली आहे. या बारा दिवसांच्या पावसामुळे विदर्भात ३७ टक्के असलेली पावसाची तूट आता जवळपास भरुन निघाली आहे.

१ जून ते ७ आॅगस्टपर्यंत विदर्भात 533  मीलीमीटर पाऊस पडलाय. सरासरीच्या हा अवघा पाच टक्के कमी पाऊस आहे. मात्र धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य तोतलाडोह धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे .येत्या दोन दिवसांत आणखी चांगल्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज असल्यानं ही तूट भरून निघेल. असा अंदाज नागपूर हवामान खात्याने व्यक्त केला

पुण्यात  रेड अलर्ट

पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पश्चिम, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल अशी माहिती पुणे हवामान विभागाने दिला आहे.

प्रामुख्याने घाट माध्यावर मोठया प्रमाणात पावसाची प्रमाण असणार आहे. त्याचबरोबर खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळेच खडकवास क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे सर्व नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे अस आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number