गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, काही गावांत पाणी शिरल्याने पुर परिस्थीती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने चंद्रपुरचे असोला मेंढा ,चंदई, नलेश्वर, चारगांव, इरई धरण 100 टक्के भरले असल्याने चंद्रपुरातील अनेक गावांना पुर येणार आहे. पाण्याची पातळीकरिता इरई धरणाचे 7 दरवाजे अड़ीच मिटरने उघड़े करण्यात आले ज्यामुळे पुर परिस्थीती निर्माण झाली आहे.
चंद्रपुरात आता पर्यंत 51 टक्के पाऊस आला आहे. इरई धरणचे दरवाजे उघडल्याने चंद्रपुरातील रहमतनगरला पाणी शिरले आहे ,अनेकांना आपले घर सोडावे लागले आहे. जिल्ह्यात पुर येण्याची अधिक संभावना असल्याने शासनाने नदी ,नाल्या काठया जवळ असणाऱ्या सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या सोबतच नागभीड़ तालुक्यातील बामनी गांवात तालाव भरल्याने पाणी गावात शिरल्याने लोकांचे हाल होत आहेत. या सोबतच मूल तालुक्यात नदीनाले तूडुंब भरून वाहत असल्याने शेतात काम करीत असलेल्या 85 वर्षीय इसमाला रेस्क्यू करुण पण्यातून बाहेर काढण्यात आले,
पवना आणि मुळा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पवना धरणातून १४ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होतो. मुळशी धरणातून ही ३० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरूच आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. पालघर जिल्ह्यातील वैतरणा, सूर्या आणि पिंजाळ या नद्यांना मोठा पूर आला असून वैतरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून सूर्या नदीद्वारे 36000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बदलापूर येथे सतत कोसळधार असणाऱ्या पावसाने ठाणे जिल्ह्यालाही ही चांगलेच झोडपून काढले आहे. यंदा धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस पडलाय. राज्यात अनेक धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ,उल्हासनगर, कल्याण डोंबिवली एमआयडीसी विभाग ठाणे महानगर पालिका तसेच मुंबईला ही पाणी पुरवठा करणारे बारवी धरण काल रात्री 7 वाजे पर्यंत 89 ℅ टक्के भरले आहे. धरणाची क्षमता 72.60 मीटर दक्ष लक्ष मीटर आहे. तर आता धरण 71.50 मीटर म्हणजेच 340 दश लक्ष इतका पाणीसाठा साचला आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीने आपली इशारा पातळी ओलांडली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीच्या दत्तनगर, काकानगर, जामवाडी तसेच कर्नाळ रोडवर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. त्यामुळे सांगलीकर पुराचे संकट कायम आहे. कोयना धरणातून 17 हजार क्यूसेक पाणी सोडले असल्याने सांगलीत कृष्णेची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे
शहापुर तालुक्यात चालू असलेल्या मुसळधार पावसाने जोर धरल्याने तानसा, वैतरणा आणि भातसा धरण ही 100% भरून वाहू लागली आहेत आज भातसा धरणाचे 5 दरवाजे 2:50 अडीच मीटरने उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये पावसाचा जोर वाढला असून गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील सगळ्यात मोठा पाऊस पडला आहे. दुतोंड्या मारूती पाण्याखाली गेला आहे.
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवर आहे. सुमारे 1000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.