जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
7 ते 11 सेंटीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत.