दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, औंरंगाबाद   मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्याने मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळाच्या छायेत होता. मात्र, औरंगाबदसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच विदर्भ व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली  आहे.     औंरगाबादच्या एमजीएमच्या हवामान केंद्रात सुमारे 75 मिलिमीटर तर चिकलठाणा केंद्रात 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   या अतिवृष्टीचा […]

दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, औंरंगाबाद

 

मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्याने मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळाच्या छायेत होता. मात्र, औरंगाबदसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच विदर्भ व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली  आहे.  

 

औंरगाबादच्या एमजीएमच्या हवामान केंद्रात सुमारे 75 मिलिमीटर तर चिकलठाणा केंद्रात 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

या अतिवृष्टीचा फटका सुमारे 4 हजार घरांना पडला. घरामध्ये सर्वत्र पाणी जमले असून घरांना तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात सक्रिय झाला असून सलग 3 दिवस राज्यात वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडत आहे. शनिवारपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number