मुंबई: राज्यात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच उष्णतेने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या नव्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दिवसाच्याच नव्हे तर रात्रीच्या वेळीदेखील उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
कोकण विभाग वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्येही तापमानाचा पारा चढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा परिसरातही तीव्र उष्णता जाणवू शकते.
अनेक शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पार
राज्यातील काही शहरांमध्ये तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. अकोला येथे 45.6 अंश सेल्सिअस, तर अमरावतीमध्ये 45.4 अंश तापमानाची नोंद झाली. जळगावमध्येही तापमान 45 अंशांच्या पुढे गेले. त्याचवेळी सांगली, सोलापूर, सातारा, नाशिक आणि अहिल्यानगरमध्येही 40 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि मनमाड परिसरातही उष्णतेचा कहर वाढला आहे. निफाडसारख्या तुलनेने थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातदेखील तापमानाने विक्रमी पातळी गाठल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
रात्रीही उकाड्याने नागरिक त्रस्त
सध्या केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही तापमान कमी होत नसल्यामुळे लोकांना झोपेचाही त्रास होत आहे. हवेत वाढलेली आर्द्रता आणि गरम वाऱ्यांमुळे रात्री उकाडा अधिक जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत नाही. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये दमट हवामानामुळे नागरिकांचा त्रास वाढला होता. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत दमट वातावरणात काही प्रमाणात घट होऊ शकते.
हवामान अंदाजासाठी आता AI ची मदत
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अचूक अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामान विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन प्रणाली सुरू केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक स्तरावर हवामानाचा अधिक अचूक अंदाज मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मान्सूनचे आगमन, पावसाचा अंदाज आणि उष्णतेच्या लाटेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठर