Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा 42 अंशांवर जाणार; असा कराल स्वतःचा बचाव?

महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने 'भीषण' वळण घेतले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा उन्हाचा चटका आणि उकाडा आगामी काही दिवस असाच कायम राहणार आहे.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा 42 अंशांवर जाणार; असा कराल स्वतःचा बचाव?

महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने ‘भीषण’ वळण घेतले आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांसाठी ‘उष्ण व दमट’ हवामानाचा इशारा दिला आहे. विभागीय सरासरीनुसार, विदर्भाचा पारा 16.3 अंश सेल्सिअस (किमान) ते 40.8 अंश सेल्सिअस (कमाल) दरम्यान असून, उत्तर महाराष्ट्रात 11.5 अंश सेल्सिअस ते 38.7 अंश सेल्सिअस, पश्चिम महाराष्ट्रात 12.6 अंश सेल्सिअस ते 39.5 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात 13.4 अंश सेल्सिअस ते 38.5 अंश सेल्सिअस आणि कोकणात 18.9 अंश सेल्सिअस ते 34.6 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा उन्हाचा चटका आणि उकाडा आगामी काही दिवस असाच कायम राहणार आहे. कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होण्याच्या शक्यता वर्तावल्या जातात. त्यामुळे उष्माघातापासून नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचे असते. 
हेही वाचा- Maharashtra Weather Update: महाराष्ट्राचा पारा चढला! अकोल्यात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद; विदर्भाला ‘उष्णतेच्या लाटे’चा तडाखा

उष्णतेच्या लाटेपासून कसं वाचाल?

उष्णतेची लाट आल्यानंतर थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळावं. 

शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं, मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.

ओआरएस (ORS), लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा ताक आदी पेय पिऊ शकता. 

कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. आवश्यक असल्यास टोपी, रुमाल किंवा छत्री वापरा. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. 

चक्कर येणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास सावलीत जा, पाणी प्या आणि विश्रांती घ्या.

घराबाहेर पडताना स्वतःजवळ पुरेसा पाणीसाठा ठेवा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number