नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट आली असून बहुतांश जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेला आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 41.4 अंश उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अकोला येथे सर्वाधिक 43.1 अंश तापमान नोंद झाली असून ही राज्यातील उच्चांकी नोंद आहे. केवळ ब्रह्मपुरी येथे तापमान 39.6 अंश तुलनेने काहीसा दिलासा मिळाला असून नागपुरात दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते. बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी पाण्याचे सेवन वाढवावे, उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. हवामान विभागाने इशारा दिला असून पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.