दोन महिन्यात विदर्भात 56 उष्णाघाताचे रूग्ण; नगरपरिषद क्षेत्रात ‘हीट अॅक्शन प्लॅन लागू’

गेल्या दोन महिन्यांत विदर्भात तब्बल 56 नागरिक उष्णाघाताने आजारी पडले आहेत. महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला हीट ॲक्शन प्लान आता नागपूर जिल्ह्यातील बेसा नगरपंचायतीनेही अधिकृतपणे लागू केला आहे

दोन महिन्यात विदर्भात 56 उष्णाघाताचे रूग्ण; नगरपरिषद क्षेत्रात ‘हीट अॅक्शन प्लॅन लागू’

नागपूर: गेल्या दोन महिन्यांत विदर्भात तब्बल 56 नागरिक उष्णाघाताने आजारी पडले आहेत, ज्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. वाढती तापमानाची तीव्रता, सततचा उकाडा आणि उन्हाच्या झळा सामान्य जनतेसाठी धोक्याचे ठरत आहेत. यामुळे नागपूरसह इतर भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उष्णतेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ‘हीट ॲक्शन प्लान’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना उष्णतेपासून तात्काळ संरक्षण देणे आणि उष्णाघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे आहे.

यापूर्वी महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला हीट ॲक्शन प्लान आता नागपूर जिल्ह्यातील बेसा नगरपंचायतीनेही अधिकृतपणे लागू केला आहे. या निर्णयामुळे आता लहान शहरांमध्येही उष्णतेच्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात असून, नागरिकांपर्यंत उष्णतेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे पोहोचवली जात आहेत. कामगार, रस्त्यावर काम करणारे मजूर आणि प्रवासी यांच्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शहरात सावली आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना
हीट ॲक्शन प्लानच्या अंमलबजावणीअंतर्गत, विविध चौकांमध्ये ग्रीन नेट लावण्यात आले आहेत, जेणेकरून सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये. तसेच, बाजारपेठा, बसथांबे, चौक व सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. रस्त्यावर काम करणाऱ्यांसाठी कूलिंग पॉईंट्स आणि शेड्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपायांमुळे उन्हामुळे होणाऱ्या त्रासात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, हीट ॲक्शन प्लान अंतर्गत शाळा, महाविद्यालये, बांधकामस्थळे आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात विशेष खबरदारी घेतली जात आहे. कामाच्या वेळा सकाळच्या थंड वातावरणात बदले जात आहेत, कामगारांना विश्रांतीचे तास देण्यात येत आहेत. स्थानिक नागरिकांना SMS, रेडिओ, सोशल मीडियाच्या माध्यमातून उष्णतेबाबत सतर्कता दिली जात आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number