सोलापुरात ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जवळपास २४ डॉक्टर तर ९ आरोग्य कर्मचारी आहेत. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी कोरोना […]

सोलापुरात ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जवळपास २४ डॉक्टर तर ९ आरोग्य कर्मचारी आहेत.

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच पद्धतीने नॉन कोविड रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आधीच ताण वाढलेला आहे. रुग्णालयात वाढणारी गर्दी आणि रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number