अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर देखील गोळी झाडून स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यातल्या आपल्या घरी आले होते.
पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. नेमकी ही हत्या करण्यामागचं कारण काय? याच उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.