जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत रात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. तसेच मुंबईतील सायन, माटुंगा, दादरमध्ये पावसाची संततधार पाऊस सुरू आहे.
पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला असून पश्चिम रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटं उशीरांने सुरु आहे. तसेच मुंबईतील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे, तर ठाणे – कल्याण, डोंबिवलीमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेचं येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Education Minister declares a holiday in all schools and colleges today in Mumbai Metropolitan Region in view of heavy #MumbaiRains: ANI #MumbaiRain #MumbaiRainsLive — SkymetWeather (@SkymetWeather) July 9, 2018