संजू बाबाचा अनोखा वर्कआऊट पाहिलात का ?

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : संजू बाब नेहमीच चर्चेत असतो अलीकडेच त्याने एक क्रिकेट संघ विकत घेतलाय. तर आता त्याने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे, यात संजू बाबा चक्क कुऱ्हाडीने लाकूड तोडताना दिसत आहे. या व्हिडिओखाली त्याने एक खास कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिले की,”बेसिक रॉ वर्कआउटकडे परत येत आहे! ‘लाकूड […]

संजू बाबाचा अनोखा वर्कआऊट पाहिलात का ?

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : संजू बाब नेहमीच चर्चेत असतो अलीकडेच त्याने एक क्रिकेट संघ विकत घेतलाय. तर आता त्याने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे, यात संजू बाबा चक्क कुऱ्हाडीने लाकूड तोडताना दिसत आहे. या व्हिडिओखाली त्याने एक खास कॅप्शन लिहिले आहे.

त्याने लिहिले की,”बेसिक रॉ वर्कआउटकडे परत येत आहे! ‘लाकूड तोडणे’ हा व्यायाम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे संपूर्ण शरीराच्या वरच्या भागाचा उत्तम व्यायाम होतो.या एक उत्तम व्यायाम आहे आणि हा सगळ्यन्नी करायलाच हवा. तुम्हाला हा व्यायाम नक्की आवडेल.

 
View this post on Instagram
  A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)


संजय दत्तच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले- ‘संजू बाबाने बॉलिवूडमध्ये बॉडी ट्रेंड सुरू केलाय.’ असे लिहिले तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले: हे काम तुम्ही करत आहात, आम्ही आमच्या आजोबांसोबत हेच काम केले आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या शरीरासाठी काम करत आहात आणि आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी हे काम केले आहे.

अभिनेता संजय दत्त गेल्या काही वर्षांपासून खलनायकाच्या भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या भूमिकांना प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत. दरम्यान तो लवकरच तामिळ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. विजयच्या लिओ चित्रपटात संजय दत्त थलपथी या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number