पिंपरी-चिंचवडमध्ये सलून मालक चक्क आठ कात्र्या घेऊन हेअरकट करत असल्याचे समजते आहे.
एवढच नव्हते तर कटिंग झाल्यावर हेयर सेटिंग करण्यासाठी हा अवलिया लायटर आणि मेणबत्तीच्या आगीचा वापर करतो.
प्रशांत यांच्या या हटके स्टाईलमुळे लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून 2-3 दिवसांपूर्वी हेअर कटिंगसाठी बुकींग करावी लागत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे.
प्रशांत यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईमुळे सलून पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे.
प्रशांत खरे सलूनचे मालक असून या आगळ्या-वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत.
प्रशांत यांनी हेअर स्टाईल ऍण्ड कटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
आठ कात्रींच्या सहाय्याने हेअर कटिंग करणे आणि मेणबत्ती किंवा लायटरच्या आगीने हेयर सेटिंग करणे प्रशांत यांची स्वत: तयार केलेल्या स्टाईल आहेत.
ही स्टाईल प्रत्येक सलूनमध्ये पोहोचावी अशी प्रशांत यांची इच्छा आहे.