समाज माध्यमातल्या जगतात एका चोरीची चर्चा होतेय. ही चर्चा होण्याचं कारण असं की, हिऱ्यांच्या कंठहाराची म्हणजेच नेकलेसची चोरी झाली आहे आणि हिऱ्यांचा नेकलेस चोरणारा अगदीच अनपेक्षित निघालाय.
हा चोर चार पायांचा आणि शेपूट असलेला आहे. आश्चर्य वाटू देऊ नका. एका सराफाच्या दुकानातल्या सीसीटिव्हीमुळे ही चोरी उघडकीस आलीय. त्यानुसार, हिऱ्याच्या हारावर चक्क उंदराने हात मारलाय. ‘हिरा है सदा के लिये’, असं घोषवाक्य लावून हिरे व्यापारी त्यांचा माल खपवतात. कदाचित हेच वाक्य या उंदराच्या कानी पडलं असावं आणि त्यालाही हिऱ्यांचा नेकलेस उंदरीला भेट देण्याची इच्छा झाली असावी. कारण, हिरा हा महिलांसाठी अत्यंत आकर्षणाची बाब आहे. त्यामुळे, नेकलेस चोरी झाली असावी. त्यातही, नेकलेस चोरणारा उंदीर होता की उंदरी याचा तपास सुरू आहे म्हणे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.