आता यूट्यूब, नेटफ्लिक्स एका क्लिकमध्ये थेट टीव्हीवर

देशातील आघाडीचा केबल आणि एफटीटीएच ब्रॉडबँड ऑपरेटर असणारं हॅथवे केबल आणि डेटाकॉम ऑपरेटरने ओटीटी सेट अप बॉक्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा सेट टॉप बॉक्स गुगलच्या अँड्रॉईड टीव्हीवर आधारीत आहे. या नव्या सेट टॉप बॉक्सचं लाँचिंग प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिच्या हस्ते करण्यात आलं.   या हॅथवे प्लेबॉक्समुळे आता आपण रिमेट कंट्रोलच्या […]

आता यूट्यूब, नेटफ्लिक्स एका क्लिकमध्ये थेट टीव्हीवर

देशातील आघाडीचा केबल आणि एफटीटीएच ब्रॉडबँड ऑपरेटर असणारं हॅथवे केबल आणि डेटाकॉम ऑपरेटरने ओटीटी सेट अप बॉक्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा सेट टॉप बॉक्स गुगलच्या अँड्रॉईड टीव्हीवर आधारीत आहे. या नव्या सेट टॉप बॉक्सचं लाँचिंग प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिच्या हस्ते करण्यात आलं.

 

Rajan_Gupta_MD_Hathway_Cable__Datacom1.jpg

या हॅथवे प्लेबॉक्समुळे आता आपण रिमेट कंट्रोलच्या सहाय्याने ‘यूट्यूब’, ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘गुगल प्ले’ सर्फ करून टीव्हीवर पाहू शकतो. एवढंच नव्हे, तर व्हॉइस रिमोटच्या माध्यमातून गुगल असिस्टंटचा वापर करता येणार आहे. एका क्लिकवर मोबाइल स्क्रीनवरील कार्यक्रम आता टीव्हीच्या पडद्यावरही पाहाता येणार आहे.

 या प्लेबॉक्समुळे लोकल कंटेंट पासून ते ग्लोबल कंटेंटपर्यंतचा थेट अॅक्सेस ग्राहकांना मिळणार आहे. या सेट टॉप बॉक्सची किंमत 2999 रुपये इतकी आहे.  

 

Ultra_Smart_Hub_1.JPG

 

गुगल असिस्टंटमुळे काय काय करता येऊ शकेल?

आपल्या आवडीच्या वेब सीरिज शोधता येतील

टायमर्स सेट करता येतील.

प्रश्नांची उत्तरं देता येतील.

हवामानाचे अंदाज समजतील

ई-कॉमर्स ऑर्डर्स प्लेस करता येतील.

हॅथवे सेट अप बॉक्समध्ये इनबिल्ट क्रोम कास्टही आहे. फोनवरचा कंटेंट थेट टीव्हीवर मिरर कास्ट करता येईल.

मोबाईल अॅपवरील कास्ट बटण टॅप करून अँड्रॉईड, आयओएस, विंडोजवरून मुव्हीज, वेब सीरिज, गेम्स, म्युझिक थेट टीव्हीवर पाहू शकतो.

गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठीही या सेट अप बॉक्समध्ये वेगळी सोय करण्यात आली आहे. ती म्हणजे एकाच स्क्रीनवर अनेक जण एकाचवेळी गेमिंगचा आनंद लुटू शकतात.

हॅथवेने भारतातल्या पहिल्या केबल हायब्रीड बॉक्सच्या लाँचिंगचीही घोषणा केली आहे. या अल्ट्रा स्मार्ट हबमध्ये एचडीआर दर्जाच्या प्ले सेवांसोबत लिनियर टीव्हीचा संयुक्तरीत्या समावेश आहे. युजर्स स्मार्ट हब गुगल प्ले स्टोअरवरून फक्त डाऊनलोड तर करू शकतातच, पण कस्टमाईझ्डही करू शकतात.  त्यामुळे आपल्या फेव्हरेट स्ट्रीमिंग सर्व्हिसचा अॅक्सेस त्यांना सहज मिळू शकतो.

हॅथवेच्या या आधुनिक टेक्नोलॉजीबद्दल माहिती देताना कार्यकारी संचालक राजन गुप्ता यांनी स्पष्ट केलंय की युजर आता गुगल प्लेवरून 2000 हून जास्त अँड्रॉई अप्स डाऊनलोड करू शकेल. युजर आता पारंपरिक टीव्हीप्रमाणेच ऑन डिमांड किंवा स्ट्रिमिंग सेवेचाही आनंद लुटू शकेल.

अँड्रोइड, क्रोम आणि प्ले बिझनेस डेव्हलपमेंट, इंडियाचे प्रमुख प्रणब मोक्केन यांनीही या नव्या सुविधेमुळे युजर्सना अँड्रॉईड टीव्हीची मजा आणखी चांगल्या प्रकारे घेता येईल, याबद्दल समाधान व्यक्त केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number