शिकताना शस्त्रं, अर्जुन आणि हर्षवर्धन बनले खास मित्र!

‘बॉर्डर’, ‘एलओसी- कारगील’ यांसारख्या युद्धपटांचे दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या आगामी ‘पलटण’ या सिनेमातही अनेक कलाकारांची पलटणच पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सोनू सूद, गुरमीत चौधरी, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ कपूर, सोनल चौहान आणि ईशा गुप्ता यांसारखे अनेक कलाकार या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहेत. या युद्धपटाच्या सेटवर अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अर्जुन रामपाल यांची मैत्री […]

शिकताना शस्त्रं, अर्जुन आणि हर्षवर्धन बनले खास मित्र!

बॉर्डर, एलओसी- कारगील यांसारख्या युद्धपटांचे दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या आगामी पलटण या सिनेमातही अनेक कलाकारांची पलटणच पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सोनू सूद, गुरमीत चौधरी, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ कपूर, सोनल चौहान आणि ईशा गुप्ता यांसारखे अनेक कलाकार या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहेत. या युद्धपटाच्या सेटवर अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अर्जुन रामपाल यांची मैत्री फार अनोख्या पद्धतीने झाली.

 

पलटणहा युद्धपट असल्यामुळे सेटवर बरेचसे कलाकार आपण सराव करत असलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल चर्चा करत असतात. असंच एका चर्चेदरम्यान हर्षवर्धनला समजलं, की काही सेकंदात अनेक लेट्स झाडणारी स्मॉल मशीन गन(SMG) अर्जुन रामपाल आपल्या भूमिकेसाठी शिकतोय. तर हर्षवर्धन स्नायपरचा सराव करतोय, ज्याचं शुटिंगचं तंत्र हृदयाच्या ठोक्यांवर अवलंबून असतं…

 

विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करासाठी पहिली आर्टिलरी गन तयार करण्याचा कार्य अर्जुनचे आजोबा ब्रिगेडियर गुरुदियाल सिंग यांच्या नावे आहे. अर्जुनलाही गन्सचं चांगलं ज्ञान आहे आणि त्यांला अनेक गन्स चालवताही येतात. हीच गोष्ट हर्षवर्धनची… हर्षवर्धननेही शालेय दिवसांत एनसीसी गन चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. हर्षवर्धनच्या वडिलांकडेही 4 गन्स होत्या. त्यामुळे हर्षवर्धनलाही गन चालवण्याचा सराव आहे.

याच समान आवडीनिवडीमुळे हर्षवर्धन आणि अर्जुनमध्ये मैत्री झाली आहे. दोघेही एकमेकांशी गनचं प्रशिक्षणाबद्दल चर्चा करत असतात. अर्जुन रामपालने आपल्याला शस्त्रास्त्रांचं चागलं प्रशिक्षण दिल्याचंही हर्षवर्धनने म्हटलं आहे. त्यामुळेच हे प्रशिक्षण, या आठवणी आणि ही मैत्री कायम जपायचं हर्षवर्धन आणि अर्जुनने ठरवलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number