जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडली. देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी कोर्टात भारताचं प्रतिनिधीत्व केलं.
हरिश साळवे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. एका दिवसाच्या सुनावणीसाठी ते तब्बल 30 लाख रुपये फी घेतात. मात्र कुलभूषण जाधव यांच्या सुनावणीसाठी त्यांनी केवळ एक रुपया फी घेतली. खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली.
कोण आहेत हरिश साळवे?
आजोबा पी. के. साळवे नावाजलेले फौजदारी वकील
दिवंगत काँग्रेस नेते एनकेपी साळवे यांचे सुपूत्र
चार्टर्ड अकाऊंटट म्हणून करियरची सुरूवात
नाना पालखीवाला आणि सोली सोराबजी या दोन कायदेतज्ञांकडे वकिलीचा अनुभव
1992 साली साळवे सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावर नियुक्ती
1999 साली भारताच्या सॉलिसिटर जनरल पदी नियुक्ती
साळवेंच्या एक दिवसाची फी तब्बल 30 लाख रुपये
हिट अँड रन प्रकरणी साळवेंनी लढली सलमानची केस
साळवेंनी हातळली बिल्किस बानो केस