अण्णांच्या आंदोलनामागे संघाचे ‘माईंड’ ; हार्दिक पटेलांचा गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  अण्णा हजारेंच्या दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस आहे, असा गंभीर आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांकडे गेल्याने संघाने हा असंतोष कमी करण्यासाठी अण्णांचा वापर चालू केलाय, असं म्हणत हार्दिक यांनी अण्णांवर प्रश्नांचा भडिमारच केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने हे सनसनाटी आरोप केले […]

अण्णांच्या आंदोलनामागे संघाचे ‘माईंड’ ; हार्दिक पटेलांचा गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 अण्णा हजारेंच्या दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस आहे, असा गंभीर आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांकडे गेल्याने संघाने हा असंतोष कमी करण्यासाठी अण्णांचा वापर चालू केलाय, असं म्हणत हार्दिक यांनी अण्णांवर प्रश्नांचा भडिमारच केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने हे सनसनाटी आरोप केले आहेत.

गेल्या चार वर्षांपासून शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. तेव्हा अण्णा शांत का होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अण्णांच्या भुमिकेवरच शंका घेतली आहे.

 मागच्या आंदोलनावेळी अण्णांना सगळ्यांचा पाठिंबा चालत होता. मग आता विरोधी पक्ष पाठिंबा देण्याचा विचार करत असताना अण्णांनी त्यांची अडचण का होतेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number