यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबई-ठाण्यासह अनेक भागात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोत्रायात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी॥ विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी॥ गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…अशा शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिल्या आहेत. तसेच ते नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यातील शोभायात्रांमध्ये सबभागी झाले आहेत.
समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी॥
विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी॥#गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…#Gudipadwa pic.twitter.com/xX2rP67QUj — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 22, 2023
संपन्नतेची, समृध्दीची, समाजाच्या सर्वांगीण विकासाची, गुढी उभारुया…! गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! असे ट्वीट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नागपूरात शोभायात्रेत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केले.
A new year, a new beginning, a new dream, a new journey ..!
Wishing you and your family a very happy Gudi Padwa, Ugadi and Chaitra Navratri!
संपन्नतेची
समृध्दीची,
समाजाच्या सर्वांगीण विकासाची, गुढी उभारुया…! गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#GudiPadwa… pic.twitter.com/x3BCm8pAIt — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2023