मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला आणखी 30 दिवस नजरकैद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईदची नजरकैद 30 दिवसांसाठी वाढवण्यात आली. त्यामुळे सईदला 24 ऑक्टोबरनंतर आणखी 30 दिवस नजरकैदेत ठेवलं जाणारंय. दरम्यान, न्यायिक आढावा बोर्डानं सईदच्या अन्य चार साथीदारांची नजरकैद वाढवण्यास मात्र नकार दिला. ‘जमात उद दवा’चा प्रमुख हाफीज सईदसह त्याचे साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान […]

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला आणखी 30 दिवस नजरकैद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईदची नजरकैद 30 दिवसांसाठी वाढवण्यात आली. त्यामुळे सईदला 24 ऑक्टोबरनंतर आणखी 30 दिवस नजरकैदेत ठेवलं जाणारंय.

दरम्यान, न्यायिक आढावा बोर्डानं सईदच्या अन्य चार साथीदारांची नजरकैद वाढवण्यास मात्र नकार दिला. ‘जमात उद दवा’चा प्रमुख हाफीज सईदसह त्याचे साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद आणि काझी काशिफ हुसेन या पाचही जणांना गुरूवारी लाहोर हायकोर्टात कडेकोट बंदोबस्तात न्यायिक आढावा बोर्डापुढे हजर करण्यात आलं.

यावेळी पंजाबमधील गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सईद आणि इतर चार जणांची नजरकैद तीन महिन्यांसाठी वाढवून मागितली. मात्र, सईदची नजरकैद 30 दिवसांसाठी वाढवताना अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास बोर्डाने नकार दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number