ज्ञानवापी प्रकरण आता जलदगती न्यायालयात

ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात येण्याबाबतची याचिका आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी सुनावणी ३० मे रोजी होणार आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणी विश्व वैदिक सनातन संस्थेने वाराणसी जिल्हा न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ज्ञानवापी परिसर हिंदूच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाची […]

ज्ञानवापी प्रकरण आता जलदगती न्यायालयात

ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात येण्याबाबतची याचिका आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी सुनावणी ३० मे रोजी होणार आहे.

ज्ञानवापी मशीद प्रकरणी विश्व वैदिक सनातन संस्थेने वाराणसी जिल्हा न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ज्ञानवापी परिसर हिंदूच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात येण्याबाबत याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, ही याचिका आता जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. महेंद्र पांडे यांच्या जलदगती न्यायालयात ३० मे रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. वाराणसी दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हिंदू पक्षाने दिवाणी न्यायालयात ज्ञानवापी परिसर हिंदूच्या ताब्यात देण्याची तसेच पूजा करण्याची मागणी करणारी याचिका केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. असून हे प्रकरण जलदगती न्यायालायत वर्ग केले असून याप्रकरणी पुढील सुनावणी ३० मे रोजी होणार आहे.

काय आहेत मागण्या?

संपूर्ण ज्ञानवापी परिसर हिंदूच्या ताब्यात द्या.


ज्ञानवापी परिसरात विश्वेश्वराच्या पूजेची व्यवस्था करावी.


ज्ञानवापी परिसरात मुस्लिम नागरिकांच्या प्रवेशांवर बंदी घालावी.


ज्ञानवापीचा घुमट पाडण्याचे आदेश जारी करावे.


दरम्यान, ज्ञानवापी मशिदीप्रकरणी मंगळवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षबाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. त्यानुसार ज्ञानवापी मशिदीवर पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number