प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायन शाळेनं याप्रकरणात हलगर्जीपणा केल्याचं समोर आला आहे.   बस कंडक्टरनं चाकूनं गळा चिरल्यानंतर प्रद्युम्न रक्तबंबाळ अवस्थेत बाथरुममधून बाहेर आला होता. पण, त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात शाळा प्रशासनानं हलगर्जीपणा केला.   त्याला शेजारच्याच सेफगार्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथली सीसीटीव्ही दृश्य कॅमेऱ्यात कैद […]

प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायन शाळेनं याप्रकरणात हलगर्जीपणा केल्याचं समोर आला आहे.

 

बस कंडक्टरनं चाकूनं गळा चिरल्यानंतर प्रद्युम्न रक्तबंबाळ अवस्थेत बाथरुममधून बाहेर आला होता. पण, त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात शाळा प्रशासनानं हलगर्जीपणा केला.

 

त्याला शेजारच्याच सेफगार्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथली सीसीटीव्ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ड्रायव्हर आणि एका शिक्षिकेच्या सहाय्याने प्रद्युम्नला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेव्हा तो जिवंत होता. हॉस्पिटलमध्येही त्याचा श्वास सुरु होता आणि डोळे उघडे होते. पण सेफगार्ड हॉस्पिटलनं त्याला दुसरीकडे हलवण्याची शिफारस केली. त्यानंतर मग प्रद्युम्नला अर्टेमिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  या सर्वात किंमती वेळ वाया गेला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number