राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज गिरगाव न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सुनावणी पार पडली. गुणरत्न सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान, सदावर्तेंना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली आहे.
सदावर्तेंना ११ दिवसांची पोलीस कोठडी द्या.
सर्व बाजूंच्या तपासासाठी कोठडी गरजेची आहे.
पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित होता.
सदावर्तेंनी सिल्वर ओकवर पत्रकारांना पाठवण्यास सांगितले.
हल्ल्याच्या दिवशी सदावर्तेंना दोनदा नागपुरातून फोन आलेला.
जप्त केलेल्या मोबाईलमधून माहिती समोर आली.
पवारांच्या घरातील सीसीटीव्हीचा तपास सुरु आहे.
हल्ल्याआधी एक बैठक झाली.
पवारांच्या घरावरील आंदोलन म्हणजे कारस्थान नाही.
आंदोलक कोण होते हे साऱ्यांना ठाऊक आहे.
पोलिसांना हल्ल्याची कल्पना होती तर बंदोबस्त का नव्हता?
पैसे वसूल केले अशी आंदोलकांची तक्रार नाहीए.
आंदोलन वर्षभरापासून सुरू आहे.
नागपुरचा फोन हा हवेतला आरोप आहे.
दरम्यान, गिरगाव न्यायालयात सातारा पोलिसही उपस्थित होते. साताऱ्यात सदावर्तेंवर मराठा आरक्षणप्रश्नी गुन्हा दाखल झाला असून सातारा पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.