नाशिकमध्ये झळकले गुलशनाबादचे फलक

नाशिक शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकले आहे. बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिक ऐवजी शहराचा गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. मुघलकाळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असं होतं. मात्र पेशवाईच्या काळात गुलशनाबादचं नामकरण नाशिक असं करण्यात आलं. या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता […]

नाशिकमध्ये झळकले गुलशनाबादचे फलक

नाशिक शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकले आहे. बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिक ऐवजी शहराचा गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. मुघलकाळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असं होतं. मात्र पेशवाईच्या काळात गुलशनाबादचं नामकरण नाशिक असं करण्यात आलं. या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु नाशिकमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुघल काळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असं होतं. मात्र त्यानंतर गुलशनाबादचं नामांतर नाशिक असं करण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number